घराला उंबरठा असेल तर घरात सुखशांती नांदेल !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मित्रांनो, उंबरठ्या शिवाय वास्तू म्हणजे अपूर्ण आहे असे मी म्हणेल. उंबरठा हा आपल्या मुख्य म्हणजेच सिंहद्वाराच्या चौकटीतला, जमिनीवरचा चौथा भाग.

आज मी जे घर, वास्तु परिक्षणाच्या वेळी बघते, बहुतांश घराला आजकाल उंबरठा नसतो. उंबरठा ही वास्तूतल्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी आहे. आपण राहतो त्या घरातल्या वास्तूपूरुषाची सीमा आहे. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार उंबरठा हा असायलाच आहे.

उंबरठ्या पाशी बाहेरून येणारी नकारात्मक उर्जा, नकारात्मक विचार यांचा नाश होतो आणि घरात सकारात्मकता नांदते. तेव्हा घराच्या ऊर्जा नियंत्रणासाठी उंबरठा फार गरजेचा आहे.

उंबरठा हा लाकडी असावा. सागवानी असेल तर अजून उत्तम. जशी आपण गृह प्रवेश करतो, वास्तुशांती करतो तसेच ‘उंबरठ्याची स्थापना’ हा एक वास्तू शास्त्रातला महत्वाचा विधी आहे.

शास्त्रशुद्ध उंबरठा हा वास्तूमध्ये भरभराट आणि ऐश्वर्य घेऊन येतो. उंबरठा हा दाराच्या चौकटीत बसवावा व त्याची १३ इंच खाली जमीनीत असावी आणि २३ इंच ही फर्शीच्या वर असावी.

वास्तु शास्त्रात उंबरठ्याला खूप महत्व दिलं आहे. आपण रोज घरी देवपूजा करतो. देवाला गंध फूलं वाहतो. तशीच उंबरठ्यावर सुद्धा सुंगधी द्रव्य लावून फूले वाहावीत, दिवा लावावा व वास्तूतील सकारात्मकतेसाठी प्रार्थना करावी. हा नित्य नियम माझ्या घरी, ऑफिसमध्ये असतो. आणि उंबरठ्यापूढे रांगोळीचे महत्व हे मी मागच्या भागात मांडले आहे.

तेव्हा तुमच्या घराला उंबरठा आहे का ? कारण तो तुम्हाला आरोग्य, सुख, शांती आणि ऐश्वर्य निश्चित प्रदान करतो.

लेखिका आकांक्षा कुलकर्णी

वास्तु आरोग्यमचे सीईओ तथा ऊर्जा तज्ञ न्यूरोलॉजिस्ट इंटरनॅशनल ट्रेनर

Leave A Reply

Your email address will not be published.