मलकापूरमध्ये दीड लाखाचा गुटखा पकडला; एलसीबीची धडक कारवाई

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात गुटका बंदी असताना जिल्ह्यात सर्रास गुटखा विक्रीसाठी आणल्या जात आहे, राज्याचे अन्न व औषध व प्रशासन मंत्री जिल्ह्याचे असताना सुद्धा जिल्ह्यात करोडो रुपयाचा गुटखा आणला जात आहे, दर आठवड्यात जिल्ह्यात कुठेतरी गुटखा पकडल्या जात आहे, अन्न व औषध प्रशासन अधिकारी यांचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होताना दिसत आहे तसेच मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे सुद्धा गुटखा विरोधात कडक पाऊले उचलताना दिसत नसल्याने गुटखा माफीयांचे धाबे चांगलेच फावत आहे. म्हणून माफीयांची हिम्मत होत असल्याची जिल्हाभर चर्चा आहे.

मलकापूर येथे रात्रीच्या सुमारास मलकापूर पोलिसाना मिळालेल्या गुप्त माहितीवरून राष्ट्रीय महामार्गावर मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी क्रमांक mh 04 Dw 1571 आणि टाटा इंडिको सीएस गाडी क्रमांक एम एच 14 सी एक्स 96 59 या दोन गाड्यांमधून विमल गुटखा जात असताना एल सी बी पोलिसांनी दोन वाहनाची कसून तपासानी केली असता एकूण १५६८२०० मुद्देमाल रुपयाचा आढळून आला.

पोलिसांनी दीड लाख रुपयांचा गुटखा व वाहने जप्त केले असून तीन ताब्यात घेऊन गुटखा बंदी कायद्यानुसार् गुन्हे दाखल करण्यात आला आहे. शेख नवाज शेख हुसेन (वय २७, रा. नांदूरा), जुनेद बेग मिर्झा बाबा (वय २३, रा. कोळंबा रसलपुर ता. नांदुरा), मो अजजम उर्फ मंजू इस्माईल बॅग (वय २५, रा. मुल्ला पुरा जामा मस्जिद नादूरा) १८८,२७३,३२८ भादवि सह कलम अन्नसुरक्षा कायदा कलम २००६ कलम २६ (२) (iv) शिक्षाप्राप्त कलम ५९ (i) गुन्हा दाखल केला आहे.

यावेळी एपीआय मनिष गावंडे, हेड सुधाकर काळे, एनपीसी संजय नागवे, गणेश पाटील कारवाई करताना हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.