दुर्देवी ! शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत

0

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील रहिवासी गणेश इंगळे यांचा मुलगा शौर्य गणेश इंगळे (वय 02)  हा दि.3 ऑक्टोबर रोजी शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

दसरखेड येथील गणेश इंगळे व शशिकला इंगळे यांचा दोन वर्षे मुलगा शौर्य गणेश इंगळे हा घरकुलाचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खेळत होता. आई आजारी असल्यामुळे घरातच झोपलेली होती तर वडील पाणी घेण्यासाठी एक्वा प्लांटवर गेले होते. खेळता खेळता शौर्य बांधकाम सुरू असलेल्या शौचालयाच्या पाणी भरलेल्या खड्ड्यात पडला. वडील घरी आल्यानंतर शौर्य कुठेच दिसून आला नाही. म्हणून त्याचा शोधाशोध केली असता तो शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याचे लक्षात आले.

वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने चिमुकल्याला बाहेर काढून त्वरित मलकापूर येथील डॉ. वराडे यांच्या दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एक दिवस अगोदर म्हणजे दि. 02ऑक्टोबर रोजी शौर्यचा दुसरा वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी चिमुकल्याचा पाण्यात बुडून अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.