ED ची मोठी कारवाई; नवाब मलिकांची संपत्ती जप्त

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने नवाब मलिकांची संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईतील संपत्ती आणि उस्मानाबादेतील 148 एकर जमिनीचा समावेश आहे. ईडीने ही कारवाई ही मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने नवाब मलिकांचे मुंबईतील पाच फ्लॅट जप्त केले आहे. यातील तीन फ्लॅट हे कुर्ला तर दोन फ्लॅट हे वांद्रे परिसरातील आहेत.

ईडीने मालिकांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेतजमीनही ताब्यात घेतली आहे. ईडीने प्रेसनोट जारी करत कारवाईबाबत माहिती दिली आहे. नवाब मलिक यांनी मनी लॉन्ड्रिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यव्हार करुन संबंधित संपत्ती मिळवली आहे. म्हणून या संपत्तीवर जप्ती आणल्याचं ईडीचं म्हणणं आहे.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जे आर्थिक व्यव्हार झाले आहेत त्या व्यव्हारातून ही संपत्ती घेतली गेली असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कुर्ल्यातील गोवावाला कम्पाऊंड, कुर्ल्यातील कमर्शिअल युनिट, तसचे कुर्ल्यातील 3 फ्लॅट आणि वांद्रेतील 2 फ्लॅट, तसेच उस्मानाबादेतील 148 एकर शेतजमीनीवर जप्त आणण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.