मालेगाव शहरात कडकडीत बंद, कृषी व्यावसायिकांचा बंदला पाठिंबा

0

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आवाहनानुसार आज (गुरुवार) मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे आज बाजारपेठेत पूर्णतः शांतात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या मालेगाव बंडाच्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्व व्यावसायिकांनी आज त्यांचे व्यवहार बंद ठेवले आहेत. या बंदमध्ये छोटे मोठे व्यावसायिक देखील सहभागी झाले आहेत.
तसेच कृषी व्यवसायिकांनी देखील बंदला पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानाने सोयाबीनला किमान ८ हजार रुपये भाव देण्यात यावा. पिकविम्याची अग्रीम रक्कम देण्यात यावी. यलो मोझ्याकच्या तक्रारी ग्राह्य धरून संपूर्ण पीक विमा मंजूर करावा. खरीप २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीची मदत देण्यात यावी व २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व गारपिटीची मदत राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी अशी मागणी केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने युवक प्रदेशाध्यक्ष दामुअण्णा इंगोले यांनी नमूद केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.