जळगावात २५ हजारांची लाच घेणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञाला अटक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

घराला लावलेले वीजमीटर नादुरुस्त असल्याने ते काढून नवीन मीटर बसविण्यासाठी महावितरणच्या ग्राहकाने तक्रार दिली होती. मीटर बदलून देण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील आदर्षनगरात कार्यरत वायरमन संतोष भागवत प्रजापती असे लाचखोर वायरमनचे नाव आहे. तक्रारदार त्यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरणाचे वीजमीटर आहे. त्यांचे जुनेमीटर नादुरुस्थ असल्याने नवीन वीजमीटर बसविण्यासाठी तक्रारदार यांनी प्रजापती यांच्याशी संपर्क साधला. तक्रारदाराने याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी खातर जमा करत सापळा रचत श्री. प्रजापती यांना तक्रारदारकडून २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडत अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.