महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेचा महत्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

दर दिवशी लाखोंचा संख्येने प्रवाशांना प्रवास सुकर करत त्यांना अपेक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या रेल्वे विभागाच्या वतीनं आणि त्यातही मुंबई लोकलच्या दृष्टीनं सतत काही न काही महत्वाचे निर्णय घेतले जातात. या निर्णयांचा प्रवाशांवर थेट परिणाम होत असतो. असाच एक नवा निर्णय घेत रेल्वे विभागानं पुन्हा एकदा प्रवाशांचा आणि त्यातूनही रेल्वे प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवत काही महत्त्वाच्या सुविधा लागू करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.

मध्य रेल्वेच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार येत्या काळात ११७ रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण बसवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक राम यादव यांनी गुरुवारी माध्यमांना संबोधित करत यासंदर्भात माहिती दिली. जिथं त्यांनी ११७ स्थानकांवर प्रत्येकी २ पॅनिक बसवणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

पॅनिक बटणांचा वापर काय?
कोणत्याही अडचणीच्या वेळेस प्रवाशांसाठी हे बटण मदतीचं ठरणार आहे. हे पॅनिक बटण दाबून, प्रवाशांना विशेष म्हणजे प्रवाशांना तातडीनं आरपीएफची मदत घेता येणार आहे. यासाठी सध्या रेल्वेच्या वतीनं ही प्रणाली राबवण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे बटण दाबल्यानंतर आरपीएफच्या नियंत्रण कक्षाला सतर्क करण्यात येईल आणि तातडीने सीसीटीव्हीच्या मदतीने मदतकार्य केले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.