श्रीदत्त जयंतीनिमित्त साकळी येथे गुरुचरित्र पारायण सप्ताह

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ (दिंडोरी प्रणित) त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक अंतर्गत श्रीस्वामी समर्थ केंद्र, साकळी यांच्या वतीने श्रीदत्त जयंती निमित्त अखंड नाम-जप व यज्ञयाग गुरुचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सप्ताह दि.२० ते दि.२७ डिसेंबर २०२३ दरम्यान होणार असून यामध्ये सुरुवातीला साकळी ग्रामदेवता निमंत्रण, मानसन्मान तसेच यज्ञातील अग्निस्थापना इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. दि.२१ रोजी नित्य स्वाहाकार, श्रीगणेश याग, श्रीमनोबोध यागचे आयोजन असणार आहे. त्याचप्रमाणे दि.२२ रोजी श्रीगीताई याग, दि.२३ रोजी श्री स्वामी याग, दि.२४ रोजी श्री चंडीयाग, दि.२५ रोजी श्री रुद्र याग यानुसार धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दि.२६ रोजी श्री दत्त जयंती, बलीपूर्णाहुती तसेच श्रीदत्त जयंती जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे दि.२७ रोजी श्रीदत्त पूजन व महाआरती होणार आहे. या सप्ताहा ठिकाणी जवळपास १०० महिला व पुरुष सेवेकरी गुरुचरित्राचे पारायण करीत आहे. तर काही सेवेकरी नियोजनाप्रमाणे अखंड नामजप करीत आहे. या सप्ताह निमित्ताने केंद्राच्या परिसरात अतिशय मंगलमय असे धार्मिक वातावरण निर्माण झालेले आहे. सप्ताहाच्या महापर्वानिमित्त गाव-परिसरातील असंख्य सेवेकरी व भावी – भक्त या ठिकाणी दर्शन घेत आहे. दररोज सकाळपासून श्री गुरुचरित पारायण वाचन सह धार्मिक विधी केल्या जात आहे.

पुराण काळातील तपस्वी ऋषीमुनी लाकडे व झाडाझुडपांपासून बनवलेल्या कुटीमध्ये बसून यज्ञयाग करायचे त्या प्रमाणे या केंद्राच्या परिसरातला पारंपारिक पद्धतीने लाकडे व झाडाझुडपांपासून आकर्षक यज्ञकुटी तयार केलेली आहे. ही यज्ञ कुटी या धार्मिक परिसराचे आकर्षण केंद्र बनलेले आहे. ही यज्ञकुटी तयार करण्यासाठी साकळीसह शिरसाड येथील सेवेकरांनी खूप मेहनत घेतली आहे. या साकळी केंद्राच्या वतीने विविध असे नैमित्तिक धार्मिक कार्यक्रम तसेच समाज उपयोगी उपक्रम राबवले जात असतात. हा सप्ताह यशस्वी करण्यासाठी साकळीसह परिसरातील असंख्य सेवेकरी परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.