Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या “आरमाराची प्रतिकृती” प्रदर्शन
    जळगाव

    महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या “आरमाराची प्रतिकृती” प्रदर्शन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 1, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव :-छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे 350 वे वर्षे आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात “जाणता राजा” हे महानाटय झाले. जळगाव येथे महासंस्कृती महोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आरमार याचे प्रदर्शन जळगाव येथील इतिहास अभ्यासक महेश माधवराव पवार ज्यांचा मुळ व्यवसाय शेती आहे. त्यांनी

    आरमार उभे केले आहे. आरामारातील प्रत्येक जहाजाची प्रतिकृती आणि त्याची माहिती लावली आहे. जळगावकरांनी या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभारले होते. शिवरायांनी कल्याण, भिवंडी येथे जहाज उभारणीचे कार्य दि.24ऑक्टोबर 1657 ला सुरु केले.सुरुवातीला पोर्तुगीजांना त्यांनी या कामासाठी पगारी ठेवले होते. पण ते फार दिवस टिकले नाहीत तेंव्हा कोकणातील स्थानिक लोकांच्या मदतीने शिवरायांनी जहाज बांधणीचे काम पुर्ण केले अशी माहिती महेश पवार यांनी दिली.
    छत्रपती शिवरायांनी आरमारात छोट्या जहाजांवर जास्त भर देत मचवा , शिबाड , पाल , गुराब , गलबत , पाटीमार इ. प्रकारची जहाजे बनवुन घेतली होती त्या सर्वांच्या प्रतिकृती तसेच चोल साम्राज्याच्या जहाजांच्या प्रतिकृती , इंग्रज व पोर्तुगीजांचे जहाज आणि आय.एन.एस विक्रांत यांच्या प्रतिकृती व त्यांचा संपुर्ण इतिहास या प्रदर्शनात दाखवला आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी लोक येत आहेत.हे प्रदर्शन पोलीस कवायत मैदानात आयोजित महासंस्कृती महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वाराला लागून आहे. हे प्रदर्शन तीन मार्च पर्यंत असणार आहे. जळगावकरांनो हे प्रदर्शन पहायला विसरू नका.

    jalgaon Mhasanakruti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif