NCC ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण

सोशल मीडियावर व्हिडिओ वायरल

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील प्रसिद्ध अशा बांदोडकर आणि जोशी बेडेकर कॉलेजमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्ष आक्रमक झाले आहे. या घटनेविरोधात सर्व राजकीय पक्ष एकवटले असून आज सकाळपासूनच कॉलेजबाहेर विविध राजकीय पक्षांचे आंदोलन सुरु आहे.

दरम्यान या मारहाण प्ररकरणातील वरिष्ठ विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रातून याबाबत आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या यानंतर महाविद्यालय प्रशासनाने ही कारवाई केली आहे. मात्र केवळ विद्यार्थ्यावरच नव्हे तर कॉलेजच्या प्राचार्यांवरही याप्रकरणी गुन्हा दाखल करावा आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी राजकीय संघटनांकडून केली जात आहे.

नेमक प्रकरण काय ?
जोशी बेडेकर महाविद्यालयात (Joshi Bedekar College) NCC च्या विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये एकच खळबळ उडाली. जोशी बेडेकर कॉलेजच्या आवारात दोडकर, बेडेकर आणि पॉलिटेक्निक या तिन्ही विभागांच्या विद्यार्थ्यांना संयुक्तपणे एनसीसीचे ट्रेनिंग देण्यात येते. पावसामुळे आवारात पाणी साचले होते, रिमझिम पाऊसही पडत होता. त्या वातावरणातही कॅडेट्सना ट्रेनिंग देण्यात येत होते, ते पुश-अपस करत होते. मात्र त्यांना ते नीट जमत नव्हते. त्यावरून त्यांना अमानुषपणे मारहाण केल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. दुसऱ्या एका विद्यार्थाने गुपचुपपणे हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आणि तो बघता बघता व्हायरल झाला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारे देण्यात येणारी ही शिक्षा अमानवी असल्याचे मत व्यक्त होत असून विद्यार्थ्यांमध्येही दहशत पसरली आहे.

कॉलेजचं म्हणणं काय ?
हा व्हिडीओ व्हायरल होताच हे प्रकरण तापू लागले आणि कॉलेज प्रशासनाला खडबडून जाग आली. हे असले प्रकार आम्ही कोणीही खपवून घेणार नसल्याचे सांगत, विद्यार्थ्यांनी बिलकूल काळजी करू नये, असे सांगत शिक्षकांनी घाबरलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तत्काळ कारवाई करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याचे, जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी स्पष्ट केले. तसेच यापुढे असले प्रकार घडू नयेत म्हणून एका कमिटीची स्थापना करण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.