मेटाचा मोठा निर्णय, फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सला धक्का

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मेटानं एक मोठा निर्णय घेत कॅनडातील फेसबुक (Facebook) आणि इंस्टाग्राम (Instagram) युजर्सला धक्का दिला आहे. आता कॅनडातील फेसबुक, इंस्टाग्राम युजर्स दोन्ही प्लॅटफॉर्मवर बातम्या किंवा बातम्यांच्या लिंक पाहू शकणार नाही.

आजच्या युगात सोशल मीडिया लोकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. लोक दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर गुंतलेले असतात. सोशल मीडियाचा वापर केवळ मनोरंजासाठीच नाही तर माहितीसाठीही होऊ शकतो. जगभरातील अनेक लोक सोशल मीडियावर वापर फक्त बातम्यांसाठी करतात. इंटरनेटच्या या जगात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platforms) उपलब्ध आहे. पण फेसबुक आणि इंस्टाग्राम हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्ही प्लॅटफॉर्म बातम्या युजर्सपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. अशातच मेटाच्या कॅनडातील फेसबॉक आणि इंस्टाग्राम युजर्सना धक्का बसणार आहे.

कॅनडातील युजर्स फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या बघू शकणार नाही
नुकताच मेटानं मोठा निर्णय घेतला असून, कॅनडातील सोशल मीडिया युजर्सला मेटाच्या या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे. मेटाच्या निर्णयानुसार, कॅनडातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्स यापुढे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत. मेटानं कॅनडामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्याही ब्लॉक केल्या आहेत.

मेटानं कॅनडात फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या ब्लॉक करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील, या कायद्याचा निषेध म्हणून मेटाने हा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम फेसबुक, गुगल आणि ट्विटरसह सर्व सोशल मीडिया कंपन्यांना लागू होणार आहे. गुगलनंही असाच इशारा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.