महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

देशातील वातावरणात पुन्हा बदल होत असून, महाराष्ट्रासह अनेक राज्यात थंडीची हुडहुडी भरली आहे. काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भात आणि यलो अलर्ट जारी केला आहे.

राज्यातील वातावरण कस असेल ?
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के.एस होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जालना, हिंगोली, आणि परभणी वादळी वाऱ्यांसह हलका आणि माध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील पुढील दोन तर तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यासोबतच जळगाव, पुणे, सांगली आणि सोलापुरातही सरीचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत असून, हातातोंडाशी आलेल्या पिकाकडे तो डोळे लावून बसला आहे.

हवामान विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या नागपूर रडार प्रतिमानुसार पुढील 2 तासांत विदर्भात मध्यम ते तीव्र गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.