ज्येष्ठ कवी ना धो महानोर यांचे निधन..
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आपल्या लेखणीतून निसर्ग आणि जंगलातील सौंदर्यात भर घालणारे, तसेच रान कवी म्हणून ख्याती असलेले, महाराष्ट्राचे निसर्गकवी, म्हणून ओळख असलेले जेष्ठ कवी ना.धो.महानोर यांनी वयाच्या 81 व्या वर्षी दीर्घ आजाराने आज सकाळी 8,30 वाजता रुबी हॉस्पिटल पुणे येथे अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या रूपाने एका प्रतिभाशाली आणि आपल्या शब्दांनी समृद्ध करणारा कवी आणि भूमिपुत्र हरपला.
उद्या त्यांच्या गावी पळसखेडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांनी आपल्या कवितेतून साऱ्यांना निसर्गाविषयी जागरूक करण्याचे कार्य केले. जैत रे जैत या सिनेमातुन त्यांनी आपली अमीट अशी छाप सोडली.