पद्मालय स्कूल चोरी प्रकरणी तीन संशयीतांना अटक

0

जळगाव ;-तालुक्यातील शिरसोली येथील पद्मालय इंग्लिश मिडीयम स्कुल येथे चोरी करून कागदपत्रांचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी ३ संशयितांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने २ दिवसाची पोलीस कोठडी दिली असून एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात पद्मालय इंग्लिश मिडियम स्कूलमधील स्टोअर रूमचे कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ईलेक्ट्रीक मोटार, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर, इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या असा मुद्देमाल चोरून नेला होता. तसेच शाळेतील कागदपत्रांचे नुकसान केले होते.

याप्रकरणी शिक्षक निशादराज रंगनाथ बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जुलै २०२३ रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी केलेल्या तपासात ही चोरी शिरसोली गावातील मुलांनी केल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीसांनी मंगळवारी १ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अजय विजय भिल (वय-२२), किरण गोपाळ कोळी (वय-२१) आणि मयूर गोपाळ बारी (वय-१८) सर्व रा. शिरसोली ता.जि.जळगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बुधवारी २ ऑगस्ट रोजी तिघांना जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती सुवर्णा कुळकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील संशयिताकडून अजून काही गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.