महाडीबीटी पोर्टलवर लाभ मिळणेसाठी नवीन प्रणालीचा वापर करावा

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

कृषि विषयक 25 पेक्षा अधिक योजनांचा लाभ महाडिबीटी पोर्टलद्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पध्दतीने मिळत आहे. यापूर्वी महाडिबीटी पोर्टलवर विविध घटकांसाठी अर्ज करण्यापासून ते अनुदानाचा लाभ मिळणेपर्यंत https://mahadbtmahait.gov.in/Farmer/login/login या URL चा उपयोग केला जात होता. परंतु महाडिबीटी पोर्टलवरील तांत्रिक कारणास्तव पोर्टलवरील URL मध्ये बदल करण्यात आलेला आहे. नवीन URL चा https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/login/login याप्रमाणे राहील.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवीन URL वरील महाडीबीटी पोर्टलवर जाऊन शेतकरी योजना या सदराखाली विविध लाभाच्या घटकांसाठी नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.