महाबळेश्वरला जाताय…? मग एकदा हे नक्की वाचा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे व क्षेत्र महाबळेश्वर येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने, महाबळेश्वर कडे जाणाऱ्या पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

राज्याचे नंदनवन म्हणून महाबळेश्वरची सर्वत्र ओळख आहे. येथील अद्भुत निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी नागरिक महाबळेश्वरला पहिली पसंती देतात. सलग तीन दिवस आलेल्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी खुलून गेला आहे. महाबळेश्वर ते क्षेत्र महाबळेश्वर दरम्यान रस्त्याचे काम सुरू असलेल्या या मार्गावरील वाहतूक लिंगमळामार्गे वळविण्यात आली आहे. लिंगमळामार्गे हा रस्ता अत्यंत अरुंद व एकेरी आहे. या रस्त्यावर सहलीच्या गाड्या तसेच मोठ्या गाड्या आल्या की वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे पर्यटकांना एका जागेवर एक ते दोन तास उभे राहावे लागत आहे. आज सकाळपासूनच या रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा दिसून येत आहे. प्रशासनाने या वाहतूक कोंडीवर योग्य तोडगा काढून पर्यटकांना दिलासा द्यावा अशी मागणी पर्यटकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.