जाणून घ्या राम मंदिराच्या उभारणीसाठी ‘महाराष्ट्रा’ने काय पाठवले ?

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येच्या राम मंदिरात राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. आज प्रत्येक जण दिवाळी साजरी करतोय, संपूर्ण देश रोषणाईने उजळून निघाला आहे. 500 वर्षांची प्रतीक्षा अखेर आज संपली. आजपासून भावीक राम मंदिरात जाऊन आपल्या प्रभूचे दर्शन घेऊ शकतील. अयोध्येतील या मंदिराच्या उभारणीत सर्वसामान्य नागरिकांपासून विविध राज्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ ची धारणा स्पष्टपणे दिसून येते. राम मंदिराच्या निर्माणात राजस्थान नागौरच्या मकरानाचा वापर झाला आहे. मकरनाच्या मार्बल पासून राम मंदिराच्या गर्भगृहात सिंहासन बनविण्यात आलेले आहे. या सिंहासनावर प्रभू रामचंद्र विराजमान होतील. भगवान श्रीराम यांच्या सिंहासनावर सोन्याच्या मुलुमा आहे. गर्भगृह आणि जमिनीवर मकरानाचा सफेद मार्बल आहे. मंदिराचे काम उभारणीसाठी सुद्धा मकराना मार्बलचा वापर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रानं काय दिलं?
कुठल्या राज्याने काय दिलं ? ही यादी इथेच संपत नाही. पितळीपासून बनवलेली भांडी उत्तर प्रदेशातून आली आहे. पॉलिश केलेले सागवान लाकूड महाराष्ट्रातून आला आहे. विटा जवळपास पाच लाख गावांमधून आलेले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.