अखेर प्रतीक्षा संपली…राम लल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

अयोध्येतील राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्या देखील गर्भगृहात उपस्थित होते. गणेश पूजनाने या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर १२ वाजून २९ मिनिटांनी हा प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाला. ८४ सेकंदाच्या अभिजात सूक्ष्म मुहूर्तावर हा विधी संपन्न करण्यात आला. प्राणप्रतिष्ठा संपन्न झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील राम मंदिरावर पुष्पवर्षाव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती..

उपस्थितांना दिली जाणार खास भेट
प्राणप्रतिष्ठेसाठी आयोजित निमंत्रितांना खास भेट दिली जाणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटना वेळी खोदलेली माती आणि राम मंदिराची प्रतिमा याचा भेटीमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींना यावेळी ‘पंधरा फुटा’ची राम मंदिराची खास प्रतिमा भेट दिली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.