पत्नी बुडाल्याचा आव आणत पतीने केले असे काही…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गोवा येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीने आपल्या पत्नीलाच बीचवर पाण्यात बुडवून ठार केल्याचे प्रकरण समोर आला आहे. या प्रकाराला त्यांनी अपघात वासविण्याचा प्रयत्न केला. आपण आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेलो होतो. तितक्यात पत्नीला लाटांनी आत ओढले आणि ती बुडाली असा बहाना त्याने केला. पोलिसांनाही सुरुवातीला हेच खरे वाटले, परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. त्याचे बिंग फुटले आणि पत्नीच्या हत्ते प्रकरणात गोव्यातील एका मोठ्या हॉटेलचा मॅनेजर असलेल्या या पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

दक्षिण गोव्यातील एक लक्झरी हॉटेलचे मॅनेजर असलेल्या गौरव कटियार (वय 29) याने गोव्याच्या काबोडी रामा समुद्रकिनारी त्याची पत्नी दीक्षा गंगवार (वय 27) हिला फिरायला नेले होते. तेथे काही कारणाने दोघांमध्ये भांडण झाले. गौरव आणि दीक्षा यांच्यात वाद वाढत गेला आणि त्यांनी तिला समुद्र ढकलून दिले. त्यानंतर आरडा ओरड करीत नागरिकांना बोलवले पण पत्नीसाठी आईस्क्रीम आणायला गेलो आणि ती पाण्यात पोहत असताना बुडाली असा, त्याने बनाव केला. पोलिसांनी देखील सुरुवातीला हे खरेच आहे की काय असे समजले.

 

शेवटी बिंग फुटलेच

पोलिसांना शुक्रवारी दुपारी समुद्रकिनारी दीक्षाचा मृतदेह रामबाग बीचवर सापडला शुक्रवारी दुपारी पावणेचार वाजता हा प्रकार घडला. पोलिसांना तिच्या शरीरावर जखमा आढळल्याने त्याचा संशय आला. पोलिसांनी स्थानिक सीसीटीव्हींची पाहणी केली. समुद्रकिनाऱ्यावरील काही जणांची चौकशी केली. अखेर एका स्थानिकाने मोबाईल मध्ये केलेल्या शूटिंग मध्ये गौरव समुद्रात जाताना आणि येताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला आपला खाकीचा हिसका दाखविला. त्यानंतर त्यांनी आपल्या अनैतिक संबंधांवरून पत्नीशी वाद झाल्याचे तिची हत्या केल्याची कबुली दिली. दीक्षा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील राहणारी आहे. गौरव सुद्धा लखनऊचा रहिवासी असून एक वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. दक्षिण गोवा कोलवा परिसरात तो एक रेस्टॉरंट चालवत होता. आता गोवा पोलिसांनी गौरवला अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.