रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या

0

जळगाव – येथील एमआयडीसी परिसरातील सुप्रीम कंपनीत माल पोचविण्यासाठी जात असलेल्या मालवाहू रिक्षाचालकाला थांबवून त्याला मारहाण करत लूट केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.

गोपाळ एकनाथ शिदे (रा. मुसळी ता धरणगाव) हे त्यांचे मालवाहु रिक्षाने दि. ८ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुप्रिम कंपनी एमआयडीसी, जळगाव येथे माल पोहचविण्यासाठी जात होते. कंपनीच्या गेटसमोर आले असतांना काळ्या रंगाचे प्लेंडर मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी ईसमांनी त्यांच्या जवळ येउन  मारहाण केली. तसेच, पँटच्या खिशातुन ३ हजार ५०० रुपये बळजबरीने काढुन घेतले होते. म्हणुन गोपाळ शिदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात दोन ईसमाविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासामध्ये पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांना माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार राकेश भिमराव सपकाळे रा. रामेश्वर कॉलनी व त्याचा साथीदार गोपाळ रविद्र पाटील रा. आदित्य चौक, रामेश्वर कॉलनी  याच्या मदतीने केला आहे. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबुल केले.  न्यायमुर्ती  सुवर्णा कुलकर्णी याच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. सदरची कारवाई ही  पोउनि / निलेश गोसावी, पोउनि/दिपक जगदाळे, सफौ/अतुल वंजारी, पोहेकॉ/गणेश शिरसाळे, योगेश बारी, सचिन पाटील, किशोर पाटील, ललीत नारखेडे, साईनाथ मुंढे अशांनी केली असुन राकेश सपकाळे याच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.