देशात ‘लम्पीचं’ थैमान; 82 हजार जनावरांचा मृत्यू

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कोरोना (Covid 19) पाठोपाठ आता देशात लम्पी (Lumpy) आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लम्पीमुळे देशात आतापर्यंत एकूण 82 हजार जनावरांचा (cattle) मृत्यू झाला आहे. तर राज्यात (Maharashtra) देखील लम्पीचा वेगाने प्रादुर्भाव होत असून, राज्यात आतापर्यंत 187 जनावरे या आजाराने बळी पडली आहेत.

लम्पीच्या वाढत्या प्रादुर्भावाने सरकार सतर्क झाले असून, साथ नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटी रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच देशभरात लम्पीच्या लसीकरणाला देखील वेग येत आहे. लम्पी या आजारामुळे अचानक गुरे दगावत असल्याने याचा मोठा फटका हा शेतकऱ्यांना बसत आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पीच्या नियंत्रणासाठी जिल्हा स्थरावर प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.