लोअरपरळच्या पुलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्यात आली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

लोअरपरळच्या पुलाची डेडलाईन पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबई महानगर पालिका (Mumbai Municipal Corporation) आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने होणारा हा पुल एप्रिल महिन्यात पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतू काम थांबल्याने आता हा पूल पावसाळ्यानंतर पूर्ण होणार असल्याचे म्हटले जात आहे. शहराच्या हद्दीतील काम पालिकेमार्फत सुरू असून आता हा पूल पावसाळ्यानंतर ऑक्टोबर महीन्यात सुरू होईल असे म्हटले जात आहे.

मुंबई आयआयटी (Mumbai IIT) आणि रेल्वेच्या ऑडीटमध्ये हा पूल धोकादायक ठरविल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर रेल्वेच्या सर्व पुलांचे सेफ्टी ऑडीट करण्यात आले होते. त्यानंतर या पुलाला धोकादायक ठरविण्यात आहे. गोखले पुलांच्या बांधकामासाठी तोही पुल बंद करण्यात आला आहे. त्यात आता लोअरपरळ पुलाची डेड लाईन पुढे ढकलण्यात आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची चांगलीच अडचण होत आहे.

पालिकेच्या ऑगस्ट २०२२ च्या इंटर्नल अहवालात या पूलाला उशीर होण्यामागे पश्चिम रेल्वेला गर्डर टाकण्यासाठी झालेला उशीर असे म्हटले आहे. जी.के. रोडवरील सॉलीड रॅम्प आणि एन.एम. जोशी मार्गावरील उत्तर बाजूचा एप्रोच भाग बांधून झाला आहे. रेल्वेने रेल्वे रूळांवरील जुना साचा पाडून नविन वेब गर्डर टाकले आहेत. पश्चिम रेल्वेने पहीला गर्डर गेल्यावर्षी जून २०२२ मध्ये तर दुसरा गर्डर सप्टेंबरमध्ये लाॅंच केला. रेल्वेने पूर्व बाजूची एप्रोच लॅण्ड चार ऑक्टोबरला पालीकेच्या ताब्यात दिली आहे. गर्डर टाकण्यासाठी ही जागा रेल्वेने आपल्या ताब्यात घेतली होती. पालिकेने दोन्ही एप्रोच लॅंडचे काम ऑक्टोबर २०२२ पूर्वी पूर्ण केले आहे. आणि पूर्व बाजूच्या एप्रोच लॅण्डचे काम पालिकेने चार महीन्यांपूर्वी सुरू केले आहे. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.