लोकखाद्य : पनीर खीर

0

लोकशाही, विशेष लेख

 

आपण सणवार साजरे करतो तेव्हा गोडधोड पदार्थ बनवत असतो. नेहमीच पुरणपोळी (Puranpoli), श्रीखंड पुरी (Shrikhand Puri), आमरस पुरीचा (Amras Puri) बेत असतोच. थोडं काही तरी वेगळं करुयात म्हंटल तर खीर करुयात असा देखील बेत ठरतो. खीरीचे पारंपरिक प्रकार तर ठरलेलेच, तांदळाची खीर, गव्हाची खीर, शेवयांची खीर नाही म्हंटले तर साबुदाणा खीर देखील बनवली जाते.
पण आज आपण अगदी रूचकर थोडी वेगळी अशी पनीर खिर पाहणार आहोत. होय पनीर खिर (Paneer Kheer) …… आपण पनीर टिक्का, पनीर मसाला, पनीर कढाई आणि अजून किती तरी प्रकार पनीरच्या भाजीचे पाहिले असतील पण आज आपण पनीरची खीर पाहणार आहोत चला तर मग पटकन बनवुया.

पनीर खीर

१. पनीर ५० ते ७० ग्रॅम (किसुन घेणे)
२. दुध १ लिटर
३. काजु १० ते १५
४. बदाम १० ते १५
५. बेदाणे २० ते २५
६. साखर १२५ ग्रॅम
७. चारोळे ४ ते ५ चमचे
८. वेलची पावडर १ चमचा
९. तांदुळ पीठ १ ते २ चमचा
१०. खसखस 1 चमचा

कृती:
१. प्रथम मंद आचेवर दुध गरम करायला ठेवावे.
२. दुध अधुन मधुन हालवत रहावे, थोडे दुध आटले की त्यामध्ये साखर घालावी.
३. साखर विरघळली की १ चमचा तांदळाचे पिठ थोड्या पाण्यात घालून एक सारखी स्लरी बनवावी.
४. ती स्लरी दुधात घालून हालवून घ्यावी. वेलची पावडर घालून दुध हालवून घ्यावे.
५. आता एका पॅनमध्ये एक एक ड्रायफ्रुट तुपामध्ये भाजुन घ्यावे व खिरीमध्ये घालून ते एकत्र करून घ्यावे.
६.सर्वात शेवटी पनीरचा किस घालून २ ते ३ मिनट खीर चांगली चांगली शिजू‌ द्यावी.

टीप: दाटपणा कमी असले तर आणखी 1 चमचा पीठ टाका.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे.
पत्रकार/फूड ब्लॉगर
९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.