Tuesday, November 29, 2022

जन्म-मृत्यु नदीचे दोन किनारे होय..

- Advertisement -

प्रवचन सारांश – 14.10.2022 

- Advertisement -

जन्म-मृत्यू हे नदीचे दोन किनारे होय. जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू हा ठरलेला असतो. असे मोलाचे विचार आजच्या प्रवचनात मांडण्यात आले.

- Advertisement -

- Advertisement -

जन्म-मृत्यू हे जीवनाचे वास्तव सत्य आहे. १२ भावनांचे चिंतन सुरू असते, आत्मा अजरामर असतो, शरीरातून आत्मा निघून गेल्यावर मृत्यू येतो. जीव मोह, मायेत गुरफटतो त्याला मृत्युचा विसर पडतो जणू आपण पृथ्वीवर कायमचे आलेलो असतो अशा पद्धतीने तो वागतो. भय प्रकारात मृत्यूचे भय प्रामुख्याने समाविष्ट आहे. भगवंताने समाधी मरणाला खूप महत्त्व दिलेले आहे. ‘मेरी भावना’ प्रवचन मालेत ‘लाखों वर्षो तक जीऊँ, या मृत्यु आज हो आ जावे’ या ओळींचे विश्लेषण डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य जयपुरंदर म.सा. यांनी आजच्या प्रवचनात केले.

“धन, तन, लाज” या तिघांपैकी कुणाला प्राथमिकता द्यावी ? या तीन ‘गोष्टींपेक्षा ही ‘धर्म’ खूप महत्त्वाचा असतो. माझ्या नंतर माझ्या परिवाराचे काय होईल ? या चिंतेमुळे, आसक्तीमुळे मृत्यूला भीत असतो. मृत्यूला न घाबरणारा अर्णक अर्णक श्रावक याचे उदाहरण प्रवचनात दिले. साक्षात मृत्यु समोर असताना अर्णक श्रावक ध्यान, चिंतनात मग्न असतो. आपल्या धर्माला सोडत नाही. त्या अर्णक श्रावकाचे उदाहरण खूप मोलाचे ठरते असे प्रवचनात सांगितले. पापाला घाबरले तर  तुमच्या हातून वाईट काम होणार नाहीत असे सांगितले.

स्वाध्याय भवनात जयगच्छाधिपती १२ वे पट्टधर आचार्य श्री. पू. पार्श्वचंद्र म.सा. आदिगणा 7 व समणीजी यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास सुरू आहे.

डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर म.सा. यांनी ‘आराम शास्त्र’ प्रवचनात सांगितले की, दुर्लभ बोधी कठीण असते. दुर्लभ गोष्टी अनेकांना त्यांचा परिस्थितीनुसार बदलत असतात. भगवंताने कोणत्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यात आली. परमदुर्लभ अशा चार गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यात मनुष्यत्व, श्रवण, श्रद्धा आणि संयममध्ये पराक्रम हे चार प्रकार  आहेत. हिरा म्हटला तर कोहिनुर हिऱ्याला दुर्लभ मानले जाते.  कराण जगात एकमेव अद्वितीय आहे त्यामुळे तो दुर्लभ आहे. दुर्लभ गोष्टीत मनुष्यत्व म्हणजे मनुष्य जन्म- खूप दुर्लभ असतो. मनुष्यत्व मिळाल्यावर त्याचा सुयोग्य उपयोग कसा करावा या बदल पुढील प्रवचनात ऐकायला मिळणार आहे. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव व जेपीपी जैन महिला फाउंडेशन जळगाव यांच्यातर्फे ‘जयमल प्रीमियर लीग-2022 या  धार्मिक स्पर्धा स्वाध्याय भवनात दुपारी १:३० दररोज होतात त्यासाठी ही भाविकांनी खेळ बघायला नक्की यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या