Saturday, January 28, 2023

पूज्य जयमलजी महाराजांची शिकवण अनुसरा

- Advertisement -

प्रवचन सारांश 03.09.2022 

एक भवावतारी आचार्य सम्राट पुज्य श्री. जयमलजी महाराज साहेब यांची शिकवण प्रत्येकाने आपल्या जीवनात अनुसरणे खुप महत्त्वाचे आहे. “नेहमी सत्य बोला, सत्कार्य करत रहा आणि धर्माशी जुळून रहा !” हा त्यांचा संदेश होता. जयमलजी महाराजांचा नाम जपाचा महिमा आणि त्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे, अनुभवली आहे असे विचार आजच्या प्रवचनात व्यक्त करण्यात आले.

आचार्य सम्राट जयमलजी म.सा. यांचे चरित्र आपल्या प्रवचनातून सांगीतले. जयमलजी इतके पवित्र आत्मा होते की, ते आईच्या पोटात गर्भस्थ असताना डाकू दरोडा पाडण्यासाठी घरी पोहोचले. पोटातल्या जयमलजींच्या गर्भाने मातेला प्रेरणा दिली मोठ्या धीटपणाने त्यांनी “यहां से चले जाओ!” असे खमकावून सांगितले, डाकू चोरी न करता तेथून निघून गेले. त्यामुळे त्यांचे नामकरण जयमल असे करण्यात आले. ते व्यापार, व्यावसायिक परिवारातून आलेले असल्याने आपल्या व्यवसायिक कार्यासाठी मेड़ता येथे आले होते. त्यावेळी पूज्य भुधर महाराजांचा चातुर्मास ! सुरू होता. बाजार बंद असल्याने स्थानक भवनात प्रवचन ऐकायला पोहोचले. प्रवचन ऐकत असतानाच त्यांच्या मनात वैराग्य भाव जागृत झाले. तिथेच त्यांनी पक्का निर्णय घेतला की, ‘आता घरी जायचे नाही !’

- Advertisement -

घरच्या सदस्यांनी त्यांचे मन परिवर्तन करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आपल्या घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहिले. त्यांनी संयममार्ग स्वीकारून साधुत्त्व ग्रहण केले. त्यांनी संयमी जीवन काळात अनेक प्रकारच्या कठीण तपस्या, तप केल्या. एका पायावर उभे राहून प्रतिक्रमण शिकले, त्यांनी ४६ वर्षे आचार्य म्हणून कार्य केले. ‘बडी साधु वंदना’ हो तर पूज्य आचार्यश्री जयमलजी महाराज यांची देणगी आहे असे त्यांनी प्रवचनात सांगितले. जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर पू. पार्श्वचंद्रजी म.सा., डॉ. पदमचंद्र मुनी आदीठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रमात प्रवचन श्रृंखला सुरु आहे.

४ सप्टेंबर रोजी जळगाव येथील स्वाध्याय भवनात सकाळी ९.०० वाजता पू. आचार्यश्री पार्श्वचंद्रजी म.सा. व डॉ. पदमचंद्र मुनी यांच्या प्रमुख उपस्थितीत १४ वर्षे पर्यंत तसेच त्याहून अधिक वय असलेल्या तपस्या करणाऱ्या स्त्री – पुरुष यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे