संतोषामृत पिया करूँ ही भावना प्रत्येकाची असावी

0

प्रवचन सारांश – 23/08/2022 

आपल्याकडे जे आहे त्यामध्ये संतोष किंवा समाधानी असणे अत्यंत आवश्यक आहे. जे आहे त्यात समाधान नाही परंतु जे आपल्याकडे नाही त्याचे दुःख करत बसण्याचा मनुष्य स्वभाव आहे. मनुष्याने आपल्या मनात संतोष ठेवावा अर्थात प्रत्येकाने ‘संतोषामृत पिया करूँ’ ही मेरी भावना रचनेची ओळ लक्षात ठेवावी असे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिख्य जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’ या आपल्या प्रवचन मालिकेत व्यक्त केले.

त्यांनी सांगितले की, समाधानाच्याबाबत जगात चार प्रकारचे लोक असतात. ज्यांच्याकडे संपत्ती आहे पण संतोष नाही, ज्यांच्याकडे संपत्ती नाही पण संतोष आहे, ज्यांच्याकडे संतोष पण नाही आणि समाधान पण नाही असे आणि चौथ्या प्रकारातील पुण्यवान ज्यांच्याकडे संपत्ती ही असते आणि संतोष देखील असतो. जीवनात संतोषरुपी अमृत प्यायल्याने आपला आत्मा आनंदी राहू शकतो असे सांगून 24 ऑगस्ट पासून पर्युषण पर्वाचा खरा आध्यात्मिक आनंद श्रावक-श्राविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

आगम प्रवचन मालिकेच्या प्रवचनात पू. धुरंधर मुनी यांनी त्याग आणि सहा प्रकारच्या विशुद्धी बाबत सविस्तर विवेचन केले. त्याग आत्म्यासाठी सुरक्षा कवचाचे काम करते. त्यागाबरोबर सहा प्रकारच्या विशुद्धी आगम शास्त्रात सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये श्रद्धा, ज्ञान, अनुभाषणा, अनुपालना, विनय आणि सहावी सर्वात महत्त्वाची विशुद्धी म्हणजे ‘भाव’ त्याग करणारे फार कमी असतात. द्रव्य त्यागाच्या बाबत देखील काही महाभाग पळवाट शोधतात. उदारहणच द्यायचे असे तर भाजीत वरून मीठ घेऊ नये अशी सामूहिक शपथ दिल्यावर देखील काही त्यातून पळवाट काढतात. मीठाचा त्याग सांगितला तर पूर्णपणे मिठाचा त्याग करावा. भाजी कितीही अळणी असो वरून मीठ न घेण्याचा संकल्प घेतला आहे त्याबाबतचा संकल्प ढळू देऊ नये. कोणत्याही परिस्थितीत भाजीवर मीठ घेऊच नये ती खरी शपथ म्हणायला हवी.

पर्युषण कार्यक्रम 

24 ऑगस्ट पासून पर्युषण कार्यक्रम सुरू होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम स्वाध्याय भवन येथे होतील. यामध्ये अंतगढ सूत्र आणि पर्युषणपर्व यांचा काय संबंध आहे. अंतगढ सूत्रचे वाचन का करावे, त्याच्या वाचनाने काय फायदे मिळतात. पर्युषण काळात श्रावक-श्राविकांनी अंतगडसुत्राचे वाचन करावे, असे आवाहन अनुप्पेहा ध्यान प्रणेता डॉ. पदमचंद्र मुनी यांनी केले. त्याच प्रमाणे सप्टेंबर महिन्यात येणाऱ्या पूज्य जयमल जयंतीच्या औचित्याने होणाऱ्या काही कार्यक्रमात असे आवाहन ही प्रवचन सभेत करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.