रेल्वे स्थानकाजवळ अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्याचे आवाहन…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

रेल्वे स्थानकाजवळ काल २२/०८/२२ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास एका अनोळखी महिलेचा बेवारस मृतदेह आढळला असून, याबाबत रेल्वे स्टेशन मास्तर एम एल रोडगे यांच्या नजरेस पडल्याने यांनी (GRPF) लोहमार्ग पोलिसांना याबाबत माहिती दिली. याबाबत पोलिसांनी पाहणी केली, अनोळखी महिलेचे अंदाजित वय ४५-५० वेशभूषा महिलेचा अंगावर निळे ब्लाऊज, भगवी साडी, चेहरा गोल, शरीर सळ-पातळ लांब केस, रंग सावळा असे सदर महिलेचे वर्णन असून, याबाबत जळगाव लोहमार्ग पोलिसांनी सदर महिलेचे ओळख पटवण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पो.ह. रामराव इंगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.