आत्म्याचे कल्याण त्यागामुळे होते : पू. जयधुरंधर मुनी

0

प्रवचन सारांश – 22/08/2022 

जीवनात स्वच्छेने केलेला त्याग खूप मोलाचा ठरतो. ‘भोगा’तून नव्हे तर ‘त्यागा’तून आत्म्याचे कल्याण करता येते. याबाबत आजच्या प्रवचनात सांगण्यात आले.

‘सोडणे’ व ‘सुटणे’ या शब्दामध्ये खूप मोठे अंतर आहे. भिकाऱ्याला दिवसभर भीक मिळाली नाही, त्यामुळे अनिच्छेने त्याला दिवसभर उपवास घडला. त्याला ‘उपवास’ म्हणता येईल का ? परंतु जो साधक स्वतः ठरवून उपवास करतो त्याच्या उपाशी राहण्यात खरा उपवास म्हणता येईल. सोडणे म्हणजे त्यागाला जीवनात खूप महत्त्व आहे, असे डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांनी ‘आगम गाथा’ प्रवचन मालिकेमध्ये आपल्या प्रवचनात सांगितले. जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे जयगच्छाधिपती 12 से प‌ट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदीठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

‘भोग’ अशाश्वत आणि ‘त्याग’ शाश्वत आहे. भोगापेक्षा त्यागाचा स्वीकार केला तर आपल्या आत्म्याचे कल्याण करता येईल. याविषयी आगमशास्त्रात सांगण्यात आलेले अनेक उदाहरणे त्यांनी प्रवचनातून दिले.

‘मेरी भावना’ या प्रवचन मालेमध्ये ‘ब्रह्मचर्य’ आणि ‘शील’ दोन बाबींबद्दलचे महत्त्व सांगितले. मला काय करायचे?  काय करू नये? ह्या बाबत मार्गदर्शन आगम शास्त्रात करण्यात आलेले आहे. मेरी भावना या रचनेत व्यक्तीला सकारात्मक भावना जागृत करण्याची सतत प्रेरणा देत असते. ‘आशा अमर धन आहे !’. जे असंभव आहे ते प्रयत्नांनी संभव होऊन जाते, असे विचार डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदरमुनी यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले.

संसारात अज्ञानी जीव असतात. संपत्ती आहे पण संताेष नाही, संतोष पण नाही आणि संपत्ती देखील नाही. समाजात अशा दोन प्रकारच्या व्यक्ती असतात. तुमच्या आमच्या सर्वांमध्ये संतोष अमृत प्राप्त व्हावे अशा भावना प्रवचनात व्यक्त करण्यात आल्या.

पर्युषण कार्यक्रम 

24 ऑगस्ट पासून पर्युषण कार्यक्रम सुरू होत आहेत. त्या निमित्ताने विविध कार्यक्रम स्वाध्याय भवन येथे होतील. त्यामध्ये सकाळी 8.30 ला ‘अंतगढसुत्र’ वाचन वाचन, 9.30 ला विशेष दैनंदिन प्रवचन, दुपारी 2 ते 3 ‘कल्पसुत्र’ वाचन 3 ते 4 विविध धार्मिक स्पर्धा व धार्मिक क्लास, सायंकाळी 6.45 ला ‘प्रतिक्रमण’ असे कार्यक्रम होणार आहेत.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.