संतापजनक; पत्नीला करायला लावली सर्वांसमोर अंघोळ…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क;

व्यवसायामध्ये भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी एका उद्योजकाने पत्नीची अघोरी पूजा करुन मांत्रिकाच्या सांगण्यावरुन पत्नीला चक्क सर्वांसमोर आंघोळ करायला लावल्याची संतापजनक घटना विद्येचं माहेरघर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात घडली आहे.

पुण्यातल्या एक उद्योजक ऑटो प्रायव्हेटल लिमिटेडचा संचालक आहे. त्याची पत्नीदेखील या कंपनीमध्ये संचालक आहे. आपल्या व्यवसायामध्य भरभराट व्हावी तसंच घरात सुख शांती नांदावी यासाठी तो उद्योजक एका मांत्रिकाकडे गेला. यानंतर मांत्रिक मौलाना बाबा जमादार याने पीडित महिलेची अघोरी पूजा केली.

पुत्रप्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून त्याने आपल्या पत्नीला सर्वांसमोर अंघोळ करायला लावली. तसेच वेळोवेळी मारहाण करून तिच्याकडून तब्बल 1 ते 2 कोटींची रक्कम उकळले आहे.

2013 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं, त्यानंर त्या उद्योजकाने सातत्याने शारीरिक आण मानसिक शोषण केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. वारंवार मारहाण करणं आणि शिवीगाळही केली जात होती. तसंच माहेरच्यांनी दिलेल्या सोन्याचे, हिऱ्याचे आणि चांदीच्या दागिन्यांचा अपहार करण्यात आला. महिलेच्या नावावर असलेल्या फ्लॅटची कागदपत्र गहाण ठेवून त्यावर 75 लाख रुपयांच कर्जही घेण्यात आल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

याप्रकरणी पीडित महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पती, सासरा आणि सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांत्रिकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आली नाही, अशी माहिती आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ (Bharati University) पोलीस (Police) पुढील तपास (Investigation) करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.