कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे पारितोषिक वितरण

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सहविज निर्मिती प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या मनुष्यबळास स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी व त्यांच्या  कामाचे योग्य मूल्यमापन होऊन त्यांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने कोजन इंडिया मार्फत ‘National Cogeneration Awards’ ची भारतात प्रथमच सुरुवात करण्यात आली आहे. याचा पहिला पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम 27 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता मुंबईत हॉटेल “दी ललीत”, एअरपोर्ट रोड, मुंबई येथे संपन्न होणार आहे. अशी माहिती म. रा. सहकारी साखर कारखाना संघ मॅनेजमेंट डायरेक्टर संजय खताळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते पुढे म्हणाले की, त्याच दिवशी पारितोषिक वितरण सोहळ्यानंतर ‘Empowering Cogeneration’ या संबंधीचा परिसंवाद देखिल आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय रस्ते, परिवहन व राजमार्ग मंत्री नितिन गडकरी, संस्थेचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, बायोमास सहसचिव दिनेश  जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

साखर कारखान्यांच्या सहविज निर्मिती प्रकल्पातून ग्रामीण स्तरातून हरीत नुतनीकरणीय ऊर्जेचा शाश्वत पुरवठा होवून पारेषण व वितरण वीज गळतीस मोठया प्रमाणावर लगाम बसतो. परिणामी विजेच्या पुरवठयात वाढ होते. या प्रकल्पांच्या माध्यमातून अंदाजे 20 हजार कोटींची उलाढाल होवून शेतकऱ्यांना ऊस पुरवठ्यापोटी अधिकचा मोबदला मिळण्यास तसेच साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

कोजन इंडियाची स्थापन 2003 साली झाल्यापासून सहविज निर्मिती प्रकल्पांच्या विविध विषया संबंधी विशेषतः बीजेचे खरेदी दर आणि तांत्रिक बाबी याकरीता शासकीय आणि नियमन मंडळाकडे संस्थेमार्फत भक्कम बाजू मांडून प्रश्नांचे निरसन केले जाते. विविध तांत्रिक आणि अनुषंगिक विषयांवर परिसंवाद, चर्चासत्र, कार्यशाळा देशातील विविध भागात आयोजित करण्याचे काम देखिल संस्थेमार्फत केले जाते. त्यातून ज्ञानवर्धन आणि विचारांची देवाणघेवाण क्लेच एकसंघता जोपासण्यास सहविज निर्मितीमधील काम करणाऱ्या घटकांना एक सक्षम व्यासपीठ उपलब्ध होते. कुशलता विकास, नवीन संशोधनाचा प्रसार याकरीता प्रशिक्षण कार्यक्रम कोजन इंडिया मार्फत आयोजित केले जातात.

संस्थेमार्फत इंग्रजीतून Industrial Cogeneration India व मराठीतून ‘निसर्ग ऊर्जा’ या त्रैमासिक नियतकालिकेचे संबंधितांना वाटप केले जाते. त्यातून अभ्यास व नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती प्रसारीत केली जाते.

या कार्यक्रमात तीन वैयक्तिक श्रेणीतील व एक संस्था श्रेणीतील पारितोषिके बहाल केली जातील. अशा प्रकारे एकूण 21 पारितोषिके वितरीत करुन या क्षेत्रात काम करणान्या ‘Cogeneration_Jawans’ यांना सन्मानीत केले जाईल. सहकारी व खाजगी क्षेत्राकरीता त्याचप्रमाणे कमी व जास्त दाब असणाऱ्या बॉयलर आधारित प्रकल्पांकरिता ही स्वतंत्रपणे पारितोषिके देण्यात येतील.

Leave A Reply

Your email address will not be published.