हात लावताच रंग बदलतो… सरड्याला रंग बदलतांना बघाच…(व्हिडीओ)

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

कुणी जर पटकन बदललं की आपण त्याला रंग बदलणारा म्हणतो. पण तुम्हाला माहितीये का की, सरडा नेमका रंग कसा बदलतो. तुम्ही कधी सरड्याला रंग बदलताना पाहिलंय का? मग हे पहाच, रंग बदलणारा सरडा कॅमेर्‍यात कैद झाला आहे. अद्भुत असा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

जसा चष्म्याचा रंग बदलतो तसा सरडाही आपला रंग वेगाने बदलतो. कधी सौम्य जांभळा, कधी गुलाबी, कधी लाल असे आपले रंग सरडा दाखवतो. जणू हात लावताच चष्म्याचा रंग सरड्यात जातो असंच वाटतं. हे दृश्य म्हणजे आपल्यासाठी चमत्कारच. शिकार करण्यासाठी आणि शिकारी पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सरड्याला निसर्गाकडून मिळालेली ही अद्भुत देणगी.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक हिरव्या रंगाचा सरडा दिसतो जो एका टेबलावर आहे. त्यानंतर एक व्यक्ती त्या सरड्यासमोर एक सौम्य जांभळ्या रंगाचा चष्मा आणून ठेवतो, त्या चष्म्याला स्पर्श करताच सरड्याचा रंग बदलू लागतो. चष्मा ज्या रंगाचा आहे सरडाही त्याच रंगाचा होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.