जीवनात धर्माचे अधिष्ठान असावे – पू. जयधुरंधर मुनी

0

प्रवचन सारांश- 20/08/2022 

आगमकारांनी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ सांगितले आहेत. ‘धर्म’ व ‘मोक्ष’ हे सम्यक तर ‘काम’ व ‘अर्थ’ हे असम्यक आहेत. तसे पाहिले तर जीवन व्यवहारासाठी अर्थ म्हणजे पैसे प्राप्त करणे क्रमप्राप्त असते परंतु ते कमावण्यासाठी नीतीनुसार, धर्माच्या अधिष्ठानानुसार कमवाले पाहिजे. ‘अर्थ’ शिवाय जीवनाला ‘अर्थ’ नाही असे गंमतीने म्हटले जाते. ‘धन’ व ‘धर्म’ यापैकी कोणाला जास्त महत्त्व द्यावे हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. धन कमावण्यासाठी 18 पाप करावे लागतात.  परंतु धर्म आचारण केले तर 18 पापांपासून मुक्त होता येते. असे पू. जयधुरंधर मुनी यांनी आपल्या आगम प्रवचन मालिकेच्या आजच्या प्रवचनात सांगितले.

धनामुळे मित्र ही शत्रू बनतात व धर्मामुळे शत्रू ही मित्र बनलेले आहेत. धन अशाश्वत आहे तर धर्म शाश्वत आहे. जो बुद्धीवान आहे तो धर्म व धन यांची अगदी व्यवस्थित सांगड घालत असतो. धर्म अधिष्ठान प्रत्येकाने आपल्या जीवनात ठेवावे असे आवाहन मुनींनी केले.

स्वाध्याय भवन येथे जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. व अनुप्पेहा ध्यानप्रणेता डॉ. पदमचंद्र म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

माणसाने चोरी करून नये, परस्त्री मातेसमान मानून नीतीने जगण्यासाठी सदैव तत्पर असावे. नीतीने धन कमावावे असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. डॉ. पदमचंद्र म.सा. यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी ‘मेरी भावना’ या रचनेवर आधारीत प्रवचन मालिकेत सांगितले. आजच्या प्रवचनात ‘परधन-वनिता पर न लुभाउं, संतोष अमृत पिया करूँ..’ या ओळीचे विश्लेषण केले. चोरी व परस्त्री गमन यामुळे व्यक्तीचे पतन होते. सांगण्यात आलेल्या 7 कुव्यसनांमध्ये चोरी व परस्त्री गमन ह्या गोष्टींचा समावेश आहे. आजच्या काळात पैसा किंवा धन याला 11 वे प्राण म्हटले जाते.

धन किंवा पैसा ज्याचा चोरीला जातो तो आणि जो चोरतो तो अशा दोन्हीही व्यक्ती दुःखीच असतात. चोरी करणे सर्वात मोठे पाप आहे, चोरी करू नये असे आवाहन आजच्या प्रवचनात करण्यात आले. रविवारी 21 ऑगस्ट रोजी डॉ. पदमचंद्र मुनी यांचे रविवारचे विशेष प्रवचन होणार आहे. ‘समयज्ञ कैसे बने’ अर्थात वेळेचा सदुपयोग कसा करावा या अत्यंत उपयुक्त विषयावर ते बोलणार आहेत. श्रावक-श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

धर्मसभेत जळगावचे संघपती दलिचंद जैन यांच्या वयाला 90 पूर्ण होऊन 91 व्या वर्षात त्यांनी पदार्पण केले या निमित्त जयगच्छाधिपती पू. पार्श्वचंद्रजी म.सा. यांनी कौतुक करून त्यांचे शुभचिंतन केले. यावेळी त्यांचा प्रतिनिधिक सत्कार देखील करण्यात आला.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.