‘द्रव्य’ हिंसा ‘भाव’ हिंसा करू नये..

0

प्रवचन सारांश 16/08/2022 

विचारांमध्ये शुद्धी आणण्यासाठी ‘मेरी भावना’ सारख्या रचना अत्यंत उपयोगी ठरतात. शरीराला स्वस्थ ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करावा लागतो तसे मनाला स्वस्थ ठेवण्यासाठी, मनात शुभ विचार यावे यासाठी ‘मेरी भावना’ रचना म्हणजे जणू टॉनिकचेच काम करतात. जितकी तनाची तितकीच मनाची स्वस्थता देखील महत्त्वाची असते. याबाबतची चर्चा आजच्या प्रवचनातून करण्यात आली. अनुप्पेहा ध्यान प्रणेते डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य पू. जयपुरंदर मुनी यांनी मेरी भावना या मालिकेतील प्रवचन केले.

जयगच्छाधिपती 12 वे पट्टधर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्रजी म.सा. आदिठाणा 7 यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्यायभवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे.

जैन दर्शन म्हणजे विज्ञान होय. येथे सांगण्यात आलेल्या अनेक गोष्टी विज्ञानावर आधारीत आहेत. तीन मनोरथ सांगण्यात आलेले आहेत. मनाच्या रथांना लगाम देणे आवश्यक आहे. आरंभ म्हणजे हिंसा करू नये. 3 मनोरथाबद्दल फक्त बोलूच नये तर त्यांचे आचरण करणे देखील महत्त्वाचे आहे. ‘नहीं सताऊं किसी जीव को…’ ह्या ओळीचे विश्लेषण त्यांनी आजच्या प्रवचनात केले. ‘द्रव्य’ हिंसा व ‘भाव’ हिंसा अशा दोन प्रकाराची हिंसा आहेत. द्रव्य व भाव हिंसा एकत्र आल्यावर तर कर्मबंध व पाप जास्त निर्माण होतात त्यामुळे दोन्ही हिंसा करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले.

दैनंदिन जीवनात कोणतीही कृती करत असताना ‘यत्ना जोडा सर्व क्रियांमध्ये!’ असे आगम ग्रंथात सांगण्यात आलेले आहे. भूक पेक्षा कमी खावे, रात्री भोजन करू नये, खाणे व झोपणे यामध्ये किमान 3 तासांचे अंतर ठेवाने. जेवण कुठे करावे ? ह्याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. घरचे शुद्ध सात्वीक भोजन घ्यावे परंतु सुट्टीच्या दिवशी बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची पद्धत सुरू झाली आहे. त्यामुळे आहार अशुद्धीला सामोरे जावे लागते. निर्माण झालेल्या खाऊ गल्ल्यांमध्ये लोकं चटपटीत, कचरा पोटात भरतात.

खास नीट चावून खाल्ला पाहिजे. टिव्ही बघताना कधीच जेवण करून नये. केवळ जेवणाकडे लक्ष केंद्रीत असावे. जीभ फक्त साडेतीन इंचाची लालीबाई असते. परंतु जीभेच्या बोलण्यामुळे 6 प्रकारचे पाप कर्म घडून जातात. बोलण्यात विवेक कसा ठेवावा, या संदर्भात आगामी प्रवचन मालेत सांगण्यात येईल. डॉ. पदमचंद्र मुनी यांचे सुशिष्य जयधुरंधर मुनी यांचे प्रवचन अवश्य ऐकावे असे आवाहन करण्यात आले.

येत्या कृष्ण जन्माष्टमी निमित्ताने विशेष प्रवचन होईल त्यास श्रावक श्राविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले.

———□■□■ ————

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

Leave A Reply

Your email address will not be published.