Saturday, January 28, 2023

लासगाव ग्रामपंचायततर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

- Advertisement -

लासगाव ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्त भव्य असे रक्तदान शिबिर ग्रामपंचायत लासगांव मार्फत रेडक्रॉस सोसायटी जळगाव अंतर्गत आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिरात एकून 78 रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरात उत्कृष्ट सहकार्य केले.

भव्य रक्तदान शिबिराच्या अध्यक्षस्थानी आ. किशोरआप्पा पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. दिलीपभाऊ वाघ, जि. प. सदस्य पदमबापू पाटील, प.स.सदस्य ललितभाऊ वाघ, पोलिस निरीक्षक किसनराव पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, विजय रामदास पाटील, ख़लीलदाद देशमुख हे उपस्थित होते.

- Advertisement -

सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच शरीफाबी ईद्राक शेख, उपसरपंच रेखा महाजन, ग्रामपंचायत सदस्य डी. के. पाटील, वाहिद देशमुख, मनीषा बडगुजर, समाधान पाटील, तेजस्विनी खैरनार, संगीता पाटील, पैठनकर, ग्रामसेवक ए. एम. पगारे, बाळासाहेब पाटील, शिपाई राजेंद्र बडगुजर, संगणक अनिल बडगुजर यांनी मेहनत घेतली.

तर सदर शिबिराला अनमोल असे सहकार्य वी.का.सो.चेरमान गोपाल पाटील वा. चेरमान शोभाताई पाटील, संचालक डॉ. हादी देशमुख, राजेंद्र तायडे, अकबर मिस्तरी, प्रेमराज आनंदा, राजू महाजन, दयाराम सूर्यवंशी, बापू पाटील, मीनाबाई पवार, अशोक पाटील, सुनील पाटील यांचे सहकार्य लाभले.  त्याचबरोबर पोलिस पाटील पंजाबसिंग, नंदलाल पाटील, रकीब देशमुख, आबा पाटील, संजय विश्राम, बापू महाजन, नाना बडगुजर, भरत महाजन, गावातील सर्व तरुण मंडळी, प्रतिष्ठित नागरिक, मराठी शाळा, उर्दू हायस्कूल, उर्दू शाळा शिक्षकवृन्द यांचे सहकार्य लाभले.  सूत्रसंचालन व प्रास्ताविक शेख इमरान सर, वानखेडे सर, इमरान देशमुख यांनी केले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे