.. तर राज्यात लोडशेडिंग होण्याची शक्यता; उर्जामंत्र्यांनी दिले संकेत

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्यात सध्या दोन दिवस पुरेल ऐवढाच कोळशाचा साठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत (Minister Nitin Raut) यांनी असे म्हटले की, वीजेचा प्रश्न हा अत्यंत बिकट झालेला आहे. कोरोनाच्या काळात आणि लॉकडाऊनमध्ये सातत्याने वीज पुरवठा केला गेला. त्यानंतर चक्रीवादळ, महापुर या ठिकाणी वीजेचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला गेला. देशात आणि विदेशात सुद्धा कोशळाची टंचाई मोठ्या प्रमाणात असताना बाहेरुन मोठ्या दराने वीज खरेदी करुन त्याचा पुरवठा केला आहे.

नितीन राऊत म्हटले की, ग्राहकांनी वीजेचे बिल वेळेवर भरावे असे आवाहन त्यांनी केले. परंतु जे लोक वीजेचे बिल वेळोवेळी भरत नाही त्यांच्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. नागरिकांच्या अशा वागणूकीमुळे वीज निर्मात्या कंपन्यांना फटका बसतोच. कारण वीज निर्मितीसाठी पाणी आणि अन्य महत्वाच्या गोष्टींसह त्यासाठी काम करमाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा द्यावा लागतो. त्यामुळे आम्ही ज्यांच्याकडून वीजेची खरेदी केली जाते आणि नागरिकांना वितरीत करण्यात येते त्यासाठी तर पैसे लागतातच ना असे ही राऊत यांनी म्हटले आहे.

टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. त्याचा सध्या साठा दोन दिवस पुरेल अशी शक्यता आहे. त्यामुळे अशी स्थिती असताना वीजेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तर उत्पादन कमी झाल्यास लोडशेडिंगची समस्या ही उद्भवू शकते असे नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.