Live लोकसभा निवडणूक : मुख्यमंत्री फडणवीसांनी केले मतदान

0

मुंबई :- सतराव्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजेपासून सुरूवात झाली आहे. १८ राज्ये आणि दोन केंद्र शासित प्रदेशातील ९१ मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील ७ मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे.

पहिल्या टप्प्यातील मतदान आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपूरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप या ठिकाणी होत आहे. आज सकाळपासून या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदार बाहेर पडले आहेत.

*सकाळी ११ वाजेपर्यंत २४.३२ टक्के मतदान 

*उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये स्वामी रामदेव यांनी मतदान केले.

 


*देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी मतदान करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, गुरुवारी नागपूरमधील धरमपेठ येथील मतदान केंद्रावर मतदान केले. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अमृता आणि आई यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकाराशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी,  जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. यामध्ये निवडणूक एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. पुढील पाच वर्षांकरिता सरकार कोणत्या सक्षम हातात द्यायचं याचा लोक निर्णय घेतात. देशात एक मजबूत सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करावं, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब आज, गुरुवारी नागपूर येथील २२० क्रमाकांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकाराशी बोलताना गडकरी यांनी मागच्या वेळेपेक्षा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

*लक्षद्वीपमध्ये सकाळी ९ पर्यंत ९.८३ टक्के, तेलंगाणामध्ये १०.६ टक्के, अंदमान आणि निकोबारमध्ये ५.८३ टक्के, आसाममध्ये १०.२ टक्के आणि अरुणाचल प्रदेशमध्ये १३.३ टक्के मतदानाची नोंद.

*हैदराबादचे – एमआयएमचे विद्यमान खासदार आणि उमेदवार असदुद्दीन ओवेसी यांनी मतदान केले. ओवैसी हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

*मुजफ्फरनगर – भाजपचे खासदार आणि उमेदवार संजीव बालेन यांनी बुर्कच्या विरोधात बनावट मतदानाचा आरोप केला. त्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.

*उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी हल्दवाणी येथील मतदार केंद्रावर जाऊन मतदान केले.

*आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जाऊन अमरावती येथे मतदान केले.

*यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात ‘प्रहार’ पक्षाच्या उमेदवार वैशाली येडे यांनी मतदानाचा हक्क बजावला

*जम्मू- काश्मीर : जम्मूतील गांधीनगर येथील मतदान केंद्राबाहेर मतदारांची मतदान करण्यासाठी लागलेली रांग.

जगातील सर्वात बुटकी महिला ज्योती आमगेने मतदानाचा हक्क बजावला

 

*राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी सहकुटुंब मतदान केले

*‘देशाच्या विकासासाठी मतदान करा’, मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Leave A Reply

Your email address will not be published.