पंखा सुरू करतांना इलेक्ट्रिक शॉक लागुन महिलेचा मृत्यू

0

रावेर :-  तालुक्यातील भोकरी येथे घरातील पंखा सुरू करतांना इलेक्ट्रिक शॉक लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. ज्योती वसंत लहासे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव असून याबाबत पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सदर महिला तिच्या घरात पंखा सुरु करण्यासाठी प्लगमध्ये पिनची वायर लावताना इलेक्ट्रिक शॉक लागला. नातेवाईकांनी तिला तात्काळ रावेर ग्रामीण दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले.

याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.बारेला यांनी खबर दिल्याने रावेर पोलीस स्टेशनला सिआरपिसी १७४ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का.विजु जावरे हे पुढील तपास करीत आहे. जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जनजीवन होरपळून निघू लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.