लोहाऱ्याच्या माणुसकी ग्रुपने माणुसकी जागवण्याचे कार्य केले सुरू

0

मराठवाड्याचा वृक्ष खान्देशात बहरला

लोहारा ता.पाचोरा :- संवेदनाशून्य परिस्थिती समाज जीवनात सध्या दिसू लागली आहे लहानशा मतलबासाठी भावाचे भावाशी, भावाचे बहिणीशी वैर बाकी रक्ताचे नाते विसरून तर जन्मदाते आई-वडीलही वाऱ्यावर सोडली जातात याचे त्याच्याशी वैर यातून अघटित घडत माणूस पण विसरल्याची दाखले समोर येतात याला विसरून मानवता जागवण्याचे काम येथील नव्यानेच सुरू झालेल्या माणुसकी ग्रुपच्या वतीने सुरू करण्यात आले तशी माणुसकीची कृती नुकतीच या ग्रुपच्या माध्यमातून दाखवून देण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाडा औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित या तरुणाने सु-लक्ष्मी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या माध्यमातून सन २०१३ मध्ये समाजसेवी वृत्तीचा वृक्ष लावून प्रत्यक्ष कृतीतून समाजसेवेचे कार्य हाती घेतले व माणुसकी रुग्णसेवा ग्रुप घाटी औरंगाबाद या ग्रुपची स्थापना केली. या समाजसेवी वृक्षाचा वटवृक्ष होण्यास सुरुवात झाली आहे. या ग्रुपचे संलग्नित जामनेर व पाचोरा तालुक्यात तरुणांनी या कार्यास हातभार लावावा म्हणून लोहारा येथे व्हाट्सअप माणुसकी ग्रुपची स्थापना केली. यातूनच समाजसेवेचे कार्य हाती घेतले आहे. यात मानवता प्रत्यक्ष कृतीतून आपली कामगिरी दाखवून दिली अल्पशा समाजसेवेच्या कार्यास चालना देण्यासाठी महत्वकांक्षी प्रणेते सुमित पंडित यांना सोबत घेऊन जाफ्राबाद जिल्हा औरंगाबाद येथील अमोल शेळीदार (वय-२४) हा तरुण लिव्हरच्या प्रॉब्लेम मुळे घाटी येथील रुग्णालयात उपचार घेत होता. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची वडील देवाज्ञा झालेले उपेक्षित जीवनात या मातेच्या नशिबी न यावे तसेच घडले कुणाचा आधार नाही. एकुलता एक मुलगा याला उपचाराची गरज नव्यानेच येथील प्रत्यक्ष कृतीत येणाऱ्या तरुणांनी सहा रक्त बॅग व वीस दिवस उपचारासाठी लागणारा सर्व खर्च पुरविला नियतीला हे मान्य नसावे अखेर उपचाराच्या संघर्षात त्याचा मृत्यू झाला यातनामय जीवनात याचं आली पण संघर्ष हा संघर्षच असतो या परिस्थितीरुपी संघर्ष करणाऱ्या मातेला परमेश्वराने म्हातारपणाची काठी तर ठेवली नाहीच पण त्याचा जड अंतकरणाने अंतिम देह जन्मगावी न्यावा यासाठी पैसा नाही असा यक्षप्रश्न ठेवला. या मातेच्या मदतीला धावून आला तो माणुसकी नावाने स्थापन झालेला माणुसकी ग्रुप या ग्रुप मेम्बर्सनी मदतीची ची पोस्ट व्हायरल केली आणि काही वेळात मदत मिळाली ती रुपये १७००/- पण हे वेळेवर लाख मोलाची एवढे चांगले कार्य या माणुसकीचा प्रत्यय कृतीतून दाखवून दिल्याने माणुसकी ग्रुपने मानवता जागवण्याचे कार्य हाती घेतले आहे या ग्रुपची स्थापना केली आहे. ती गजानन क्षीरसागर मो.९०२१२१२३२२, रवींद्र क्षीरसागर, चंद्रकांत गीते योगेश वाणी(७७९८१६२८७८), ज्ञानेश्वर राजपूत/ पत्रकार मो.९६०४४७९१८२ इतर सदस्य यांनी यावर संपर्क साधून कोणाला या संघर्ष रुपी जीवनासाठी मदत हवी असेल किंवा आपणही करू शकतो असे वाटत असेल तर यांच्याशी संपर्क साधावा व या ग्रुपमध्ये सामील होऊन स्वयंस्फूर्तीने मदत करावी असे आवाहन या माणुसकी ग्रुपच्या माध्यमातून मदतीसाठी जवळ आलेल्या शेकडो ग्रुप मेंबर्सनी केले आहे.

समाजाच्या नितीचा बदल करावासा वाटला दुसऱ्याला सांगण्यापेक्षा कृती महत्त्वाची असे म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज सेवक सुमित पंडित यांची माहिती मिळवली प्रत्यक्ष भेट घेऊन छोट्याशा कार्याला सुरुवात करण्याचा प्रयत्न केला या कार्यामुळे उद्देश काहीही नसून आत्मीय समाधान मिळते व हे कार्य अखंडित सुरू ठेवण्याचा मानस आहे तसा तरुणांचा उत्साही प्रतिसाद मिळत असून हा वृक्ष खानदेशातही वटवृक्ष होईल असे कृतीच्या माध्यमातून होईल यात शंका नाही.
– गजानन क्षीरसागर, ग्रुप अध्यक्ष

Leave A Reply

Your email address will not be published.