पांचाळे धनगरवाडी शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

0

सिन्नर, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिन्नर तालुक्यातील पांचाळे धनगरवाडी शिवारात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. रात्री उशिरा रेस्क्यू पथक पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला घेऊन मोहदरी वनउद्यानाकडे रवाना झाले. गावकऱ्यांच्या मागणीनुसार वन विभागाने तानाजी गायधनी यांच्या गट नंबर 194 मध्ये बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. त्यात भक्ष ही ठेवण्यात आले होते. बिबट्या अलगत पिंजऱ्यात अडकला आणि ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला बिबट्याला मोहदरी वनउद्यानात हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.