मालदीवला भारताची पंगा घेणं पडले महागात, सर्व फ्लाईट बुकिंग रद्द !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताशी पंगा घेणं मालदीवला चांगलाच महाग पडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपमानजनक टिप्पणी करणाऱ्या मालदीव सरकारमधील तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आलं आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांच्या या टिप्पणीनंतर भारतात संतापाची भावना आहे. बॉयकॉट मालदीव सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मालदीवकडून आता हा सर्व वाद शांत करण्याचा प्रयत्न होत आहे. मालदीव सरकारने मोदींविरोधात टिप्पणी करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. पण या सगळ्यानंतरही वाद शांत होताना दिसत नाहीये. अनेक भारतीयांना आपली मालदीव ट्रिप रद्द केली आहे. सोशल मीडियावर ट्रिप रद्द केल्याचे स्क्रिनशॉट सुद्धा टाकले आहे. भारताविरोधात टिप्पणीचा भारताने मालदीव सरकारसमोर जोरदार पद्धतीने मंडला. मालदीवमधल्याच विरोधी पक्षाच्या नेत्यानी आपल्याच सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मालदीवमधील मीडियावर माहितीनुसार, युवा मंत्रालयातील मंत्री मालशा शरीफ, मॅरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम माजिद यांना त्याच्या पदावरून निलंबित करण्यात आलं आहे. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद मुइज्जू एका आठवड्याच्या चीन दौऱ्यावर निघत असताना हा सर्व वाद सुरु झालाय.

भारतातल्या या कंपनीचा मोठा निर्णय
मालदीव बहिष्कार अभियानादरम्यान EaseMyTrip ने एक मोठा पाऊल उचलला आहे. त्यांनी मालदीवला जाणारे सर्व फ्लाईट बुकिंग रद्द केल्या आहे. EaseMyTrip एका ऑनलाईन ट्रॅव्हल्स कंपनी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले होते. त्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी अपमानजनक टिप्पणी केली. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर EaseMyTrip ने हा निर्णय घेतला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.