लासूर येथे तरुणाची आत्महत्या

0

लासूर, ता. चोपडा : येथील राजू फेलसिंग बारेला (वय ३९ ) यांनी लासूर शेत शिवारात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. राजू बारेला हा लासूर येथे मुजरीचे काम करत होता. नेहमीप्रमाणेच लासुर ते शिवारात शेती कामासाठी गेले असता ७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास लिंबाच्या झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. नातेवाईकांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. , डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सागर पाटील यांच्या माहितीवरुन चोपड़ा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.