ललित पाटील प्रकरणात मोठी बातमी समोर, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ड्रग्स माफिया ललित पाटील याला काळ पोलिसांनी चेन्नईतून अटक केली आहे. सध्या तो मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरु असतानाच दुसरीकडे त्याच्या दोन महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे समोर येणार असून, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली आहे.

नाशिक पोलिसांनी काल प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर आज भल्या पहाटे या दोघींना पुणे पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आलं आहे. ललित पाटीलला पळून जाण्यासाठी या दोघी महिलांनी मदत केल्याचे म्हटले जात आहे, त्यामुळे पोलीस या दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहेत.

फरार होण्यास मदत
ललित पाटील फरार होण्यापूर्वी एक दिवस आधी तो प्रज्ञा कांबळेकडे येऊन थांबला होता . प्रज्ञाने त्याला आश्रय देऊन फरार होण्यास मदत केली होती. यावेळी ललितने प्रज्ञाकडून २५ लाखांची मदत घेतली होती. त्याने प्रज्ञाकडे चांदीही ठेवली होती. त्याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञाला अटक केल्याने आता तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

खूप महत्वपूर्ण माहितीही प्रज्ञाच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे प्रज्ञा आणि अर्चना पोलीस चौकशीत काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.