वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, तिनही जण बचावले

0

पुणे, लोकशाही नीज नेटवर्क

पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावर वरंध घाटात कार ९० फूट खोल दरीत गेल्याची घटना हृदयद्रावक घटना घडली आहे. गाडीतून धूर निघत असल्यानं गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले असतांना गाडी दरीत कोसळली.

पुण्याहून महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंध घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत ही भयानक घटना घडली आहे. गाडी पुण्याहून महाडच्या दिशेने जात असताना उंबर्डे गावाजवळ गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. यानंतर गाडीत काय बिघाड झाला हे बघण्यासाठी तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले.

सुदैवाने तिघे बचावले
हँडब्रेक लावला नसल्याने गाडी उताराच्या दिशेने जाऊन अचानक दरीत कोसळली. सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने यात कुणीही जखमी झालं नाही. यात मात्र गाडीचं मोठं नुकसान झालंयं. घाटामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या बाजूला संरक्षक कठडे नसल्यानं वारंवार गाडी दरीत कोसळत असल्याच्या घटना घडत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.