सत्रासेन परिसरातून ७० हजारांचे सागवान लाकूड जप्त ; वनविभागाची कारवाई

0

जळगाव – वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन कारवाई करत चोपडा तालुक्यातील सत्रासेन परिसरातून ७० हजार रुपये किमीतीचे अवैध सागवान लाकूड पथकाने जप्त केले आहे.

 

वन विभागालेल्या मिळालेल्या गुप्त माहितीवरून २ रोजी चोपडा येथील वनक्षेत्रपाल व रेंज स्टाफ यांच्यासह सत्रासेन परिमंडळातील सत्रासेनच्या पश्चिम दिशेला असलेल्या एक कौलारु घरात पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पाहणी केली असता येथे सागाचे चौपट (पलंग सह) ५३ नग, इलेक्ट्रिक कटर मशिन नग व इतर साहित्य असे अंदाजे ६९ हजार ८३२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.