अंजाळे येथील अपघातातील अल्पवयीन जखमी मुलाचा मृत्यू

0

भुसावळ : मोर नदीच्या पुलावर चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना धडक दिल्याने झालेल्या भीषण तिहेरी अपघातात गंभीर जखमी झालेल्या १४ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीकरीता मृतदेह ताब्यास घेण्यास नातेवाईकांनी नकार दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता.

यावल ते भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळील मोर नदी पुलावर १ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास भुसावळकडून यावलकडे येणाऱ्या भरधाव चारचाकीने दोन दुचाकींना धडक दिली होती. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अंजाळे येथील सोहम शेकोकार (वय १४) हा पुलावरून खाली कोसळल्याने गंभीर जखमी झाला होता. या बालकावर भुसावळ येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दुदैवी मृत्यू झाला. दरम्यान, मयत झालेल्या मुलाच्या कुटूंब व नातेवाईकांनी जोपर्यंत या अपघातास कारणीभुत असलेल्या चारचाकी वाहनचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत मयताचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आसवासं पोलिसांकडून देण्यात आल्याने गुणही दाखल करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.