कु-हा काकोडा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्युज नेटवर्क
येथील कु-हा काकोडा ग्रामपंचायत व बुलढाणा अर्बन यांच्या संयुक्त विद्यामानाने गावात विविध विकास कामाचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी भाजपवर पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत पाच पैकी एका जागेवर समाधान मानावे लागले . तर देवेंद्र फडणीस व भाजपच्या बालेकिल्ला असलेला नागपूरची जागा सुद्धा मिळवता आले नाही अशी टीका केली. पुढील भविष्य महाविकास आघाडीचेच असेल असे ते बोलले तर कु-हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारासाठी आणलेले चाळीसगाव तालुक्याचे पार्सल आपल्या भागाचा काय विकास करेल असा टोला त्यांनी मंगेश चव्हाण यांचे नाव न घेता लगावला.

बुलढाणा अर्बन चे कार्य कौतुकास्पद आहे आजपर्यंत कित्येक पतसंस्था आल्या व गोरगरिबांच्या पैशावर डल्ला मारून बुडाल्या. मात्र बुलढाणा अर्बन आशियात आपले स्थान बळकट करत आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. कु-हा गावातील बायपास व शुद्ध पाण्याच्या पिण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे त्यांनी सांगितले. यावेळेस मुक्ताई सहकारी सूतगिरणीच्या चेअरमन रोहिणी खडसे बुलढाणा अर्बनचे चीप मॅनेजिंग डायरेक्टर सुकेश झ वर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु डी पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील ,जगदीश पाटील, निवृत्ती पाटील, लोकनियुक्त सरपंच डॉ बीसी महाजन, उपसरपंच अनिल पांडे ग्रामविकास अधिकारी योगेश पवार ,संजय पाटील, दिलीप पाटील, योगेश दालमिया ,डॉ. गजानन खिरळकर ,ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.