जागतिक कर्करोग दिनानिमित्त आडगाव येथे रोग निदान शिबिर

0

चोपडा , लोकशाही न्युज नेटवर्क

चोपडा तालुक्यातील आडगाव येथील अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिनानिमित्त ग्रामस्थांचे आरोग्य निदान करण्यात आले . रक्त व रक्तदाब तपासणी करण्यात आली यावेळी शंभर पेक्षा जास्त रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला . अशी माहिती डॉक्टर सतीश गाडी लोहार यांनी दिली.
4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून सर्वत्र पाळला जातो जगभरात महिलांमध्ये गर्भाशयाची बाब सर्वांचा काळजीचा विषय झाली असल्याचे समूह आरोग्य अधिकारी डॉक्टर गाडी लोहार यांनी सांगितले.

यावेळी शेतकी संघाचे संचालक सुनील पाटील , चो.सा.का माजी संचालक रमेश जे. पाटील, भगवान माळी, निंबा पाटील, सौ कोकिळाबाई पाटील , सौ वंदना पाटील, सौ सरिता पाटील , प्रकाश माळी, श्रीमती मनुबाई पाटील , दिलीप पाटील , मंगल पाटील , गोपाल पाटील , यांचे सह एकशे दहा रुग्णांची तपासणी करण्यात आली

अंगणवाडी सेविका सौ यामिनी कुलकर्णी , आरोग्य सेविका कल्पना सोनवणे , आरोग्य सेवक दिनकर वाघ , आशा सेविका मंगलाबाई पाटील , सरला बाविस्कर , शीला बाविस्कर , कल्पना बाविस्कर , यांनी शिबिर यशस्वीतेसाठी प्रयत्न केले .

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.