डॉ.पंढरी इंगळे यांचा युवा संशोधक पुरस्काराने सन्मान.

0

चिखली , लोकशाही न्युज नेटवर्क

चिखली येथील गंगाई हॉस्पिटलचे संचालक डॉ.पंढरी उत्तमराव इंगळे यांचा बंगलोर येथील इन्स्टिट्युट ऑफ स्कॉलर या संस्थेद्वारा आयुर्वेद क्षेत्रातील पळस पुष्पाचा केस गळतीवर असलेला उपचार यावर केलेले संशोधन तसेच आयुर्वेद क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल ” युवा संशोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ पंढरी इंगळे हे शेतकरी कुटुंबातून आलेले असून त्यांनी, आयुर्वेद या विषयात, एम. डी. तसेच आचार्य पदवी धारक आहेत, तसेच गेली १० वर्षे ते चिखली येथील आपल्या गांगाई हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णासाठी सेवा देत आहेत, तसेच सामजिक कार्यात सुध्दा त्यांनी अतिशय चांगले काम केलेले आहे.
या सर्व कार्याची दखल घेत त्यांना युवा संशोधक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे, त्यांचे माजी मंत्री सदाभाऊ खोत,रयत क्रांती पक्षाचे राज्य प्रवक्ते प्रशांत ढोरे पाटील यांच्या सह मेडिकल असोसिएशन,केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनसह राजकिय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी कडून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.