अमळनेर शहरात पोलिसांचे पथसंचलन

0

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्

अमळनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अमलदार आणि रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स (RAF) व RCP जळगांव अशांनी अमळनेर शहरातील संमिश्र वस्तीतून पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदरील पोलीस रूट मार्च हा आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता पोलीस स्टेशन हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या हेतूने आज पथसंचलन करण्यात आले. पोलीस रूट मार्च हा पोलीस कवायत मैैदानापासून सुरु करुन पवन चौक, झामी चौक, माळीवाडा, बहादरपुर नाका, भोईवाडा, कसाली डीपी, वाडी चौक, पान खिडकी, सराफ बाजार, दगडी दरवाजा व शेवटी समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गांधलीपूरा पोलीस चौकी येथे येऊन पथसंचलनाची सांगता झाली.

यात डीवायएसपी राकेश जाधव, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, RAF चे निरीक्षक संतोष कुमार यादव, निरीक्षक राजकुमार सिंग, निरीक्षक बलकारसिंग, निरीक्षक अजयकुमार सिंग, मारवड पो. स्टे. सपोनि जयेश खलाने, पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ, महिला पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोड तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे ४५ अमलदार तसेच आरपीएफ चे ७० पुरुष कमांडो व ५ महिला कमांडो अशा ७५ जणांची तुकडी सह पोलीस रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च नंतर गांधलीपूरा पोलीस चौकीत शांतता कमेटीची बैठक पार पडली.

यात डीवायएसपी राकेश जाधव, डेप्युटी कमांडंट शशिकांत राय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय शिंदे यांनी आगामी काळातील सण-उत्सव लक्षात घेता शहरात शांतता अबाधित राहून कायदा व सुव्यवस्था कसा राखता येईल याविषयी शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. या मीटिंग मध्ये शहरातील शांतता कमेटीचे सदस्य, माजी नगरसेवक, पत्रकार बांधव असे उपस्थितीत होते. सदर पोलीस रूट मार्च साठी ASI संजय पाटील, पोना डॉ. शरद पाटील, पोना दीपक माळी, पोना रवि पाटील, पोना सिद्धार्थ सिसोदे हेको मधुकर पाटील अशांनी मेहनत घेतली. सदर शांतता बैठकचे सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे डॉ. शरद पाटील यांनी केले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.