कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळली; एक महिलेचा मृत्यू…

0

 

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

कोल्हापूरच्या केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्याची घटना घडली आहे, या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन महिला अडकल्या होत्या, यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर एक महिला जखमी झाली आहे. अश्विनी आनंदा यादव, असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे, तर संध्या तेली या जखमी झाल्या आहेत. या दोन महिला वॉशरूमला गेल्या असताना त्या भिंत कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकल्या. अपघातानंतर ताबडतोब बचाव कार्याला सुरूवात केली. या दोन्हीही महिलांचा कमरेपासूनचा खालचा भाग ढिगाऱ्याखाली अडकला होता. त्यांचे लोकेशन समजत नसल्याने बचाव पथकाला त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी मोठं कष्ट घ्यावे लागले.

केशवराव भोसले नाट्यगृहाची भिंत कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण आहेत, याबद्दल अजूनही प्रशासनाला माहिती मिळत नाहीये, पण तिथे असलेल्या प्रत्यक्षदर्शी पैकी एका मुलीने आपली आई तिथे असल्याचा दावा केला आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.